छायाचित्र: DOERS ही दुनिया आज वेगळीच भासतंय,
आयुष्यातली तुमची उणीव आज खूप जाणवतंय.
आयुष्यातली वळणं, आता मलाही कळत नाही.
शांततेसाठी लावलेला तो दिवाही, आता फडफडल्याशिवाय जळत नाही.
जपून टाकतोय पावलं आता,
कारण वाट कधीतरी चुकतेही.
आपले वाटणारे लोक बदलताना बघतोय,
कधी कधी मन तुटतेही.
हिरमुसतोय जीव बाबा,
तरीही नव्या उमेदीने जगाकडे बघतोय मी.
नजर शोधत असते तुम्हाला,
म्हणून तुमच्याच तत्वांवर जगतोय मी.
आणि हो,
हरतोय, धडपडतोय, पण अजूनही लढतोय मी.
आता मन एकच मागणं मागत,
संघर्षाच्या कहाणीला माझ्या अर्थ प्राप्त होऊ दे.
दुःखाच्या गर्भात जरा, सुखाचा अंकुर येऊ दे.
रेखाटतोय चित्र मीही माझ्या आयुष्याचं,
आता जरा त्यांना रंगांची संगत मिळू दे.
🎧 कविता ऐकण्यासाठी इथे क्लिक करा: बाप
✍ कवयित्री: प्रगती जकाते
🎙 कवितेचा आवाज: प्रगती जकाते