रोल बॉल राष्ट्रीय स्पर्धेसाठी सज्ज! महाराष्ट्राचा संघ विजयाच्या निर्धाराने मैदानात उतरण्यास तयाररोल बॉल राष्ट्रीय स्पर्धेसाठी सज्ज! महाराष्ट्राचा संघ विजयाच्या निर्धाराने मैदानात उतरण्यास तयार

पुणे, २१ फेब्रुवारी २०२५:

२२ ते २५ फेब्रुवारी २०२५ दरम्यान २१व्या राष्ट्रीय रोल बॉल स्पर्धेचे आयोजन कोनगनाडू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, तमिळनाडू येथे करण्यात आले आहे.

या स्पर्धेत खेळण्यासाठी महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष अश्या दोन्ही संघांची निवड झाली आहे. महिला संघाच्या कर्णधारपदाची धुरा तडफदार खेळाडू श्रुती भगत हिने समर्थपणे पेलली असून संघात वैभवी कदम, सुहानी सिंग, मंदिरा महाद्वार, शील मुथा, प्रिया चव्हाण, ऐश्वर्या कुलकर्णी, मधुरा कावरे, भूमी बाफना, राधा चव्हाण, आर्या नाईक व श्वेता कदम या खेळाडूंचा समावेश आहे.

महाराष्ट्र महिला संघाचे कर्णधारपद मिळाल्याचा मला आनंद आहे. तमिळनाडूत होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी संघ पूर्ण तयारीने सज्ज आहे. संघभावना, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर सर्वोत्तम कामगिरी करण्याचा निर्धार केला आहे. कर्णधार म्हणून संघाला एकत्र ठेवणे आणि विजयासाठी योग्य रणनीती आखणे हे माझे प्रमुख लक्ष्य आहे.

असे मत श्रुती भगत हिने व्यक्त केले.

पुरुष संघाचे दमदार नेतृत्व युवा खेळाडू रोहन दाभाडे करित असून संघात मधुसूदन रत्नपारखी, स्वराज वाकुरे, हर्षल घुघे, अमितेश बोदाडे, विराज बिंगी, सौरभ भालेराव, सत्यराज देशमुख पाटील, प्रतीक साठे, पंकज केदारे, निलेश शिंदे व मनीष राठोड हे खेळाडू समाविष्ट आहेत.

रोल बॉल हा खेळ दोन संघांमध्ये खेळला जातो. यात स्केट्स, बास्केटबॉल, हँडबॉल आणि थ्रोबॉल या चार वैयक्तिक खेळांचे एकत्रिकरण असते. प्रत्येक संघात १२ खेळाडू असतात. त्यापैकी ६ खेळाडू मैदानावर, तर उर्वरित ६ राखीव असतात. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त गोल करणे हे या खेळाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *