प्रत्येक स्त्री ही ग्रेटच असते.
गरज असते ती—तिने स्वतःला ओळखण्याची, स्वतःची कौशल्ये विकसित करण्याची. स्वतःच्या बलस्थानांना मेहनतीची जोड देऊन, आपल्याच चौकटी ओलांडून जाण्याची! नवीन संधी, नवी क्षितिजे मोकळ्या मनाने व हातांनी कवटाळण्याची!
गरज असते ती—स्वतःवर आणि स्वतःच्या कर्तृत्वावर भक्कम विश्वास ठेवण्याची. दमल्यावर, कधीतरी निराश झाल्यावर, स्वतःला धीर देऊन, पाठीवर शाबासकी देत नव्या उमेदीने आव्हाने पेलण्याची!
अष्टभुजा, अष्टावधानी अशी ही स्त्री सामान्य कशी असेल?
तिला गरज असते ती—स्वतःतल्या ग्रेटनेस ला ओळखायची, स्वीकारायची, आणि मनापासून appreciate करायची!
ही पुढची कविता त्या प्रत्येक कर्तृत्ववान स्त्रीला समर्पित…
स्त्री
दिसायला साधारणशी,
उंचीदेखील बेताचीच,
सौंदर्याच्या मोजमापातील,
काही नाही माझ्या पाशी
तरी खुप जणं मोहून जातात,
म्हणतात मला छानशी,
काय आवडलं माझ्या मधलं?
डोळ्यातली चमक,
का ओठांवरील हास्य?
सांगणं त्यांना कठीण आहे… .
कारण मी सामान्य नाही,
मी एक स्त्री आहे,
मी खरचं ग्रेट स्त्री आहे।।
मुलीचा प्रोजेक्ट मी मेहनतीने करते,
तीच्या प्रत्येक स्पर्धेला मी कायम हजर राहते,
PTA मिटींग ला पोटतिडकीने बोलते,
बाई म्हणतात मुलीला, हुशार आहे तुझी आई!
इतर जणी विचारतात, कसं तुला जमतं बाई???
सहजच हसुन मी माझं वेळेचं गणित मांडते!
नोकरी-घर-संसाराचं कोष्टक त्यांना सांगते!
कारण मी सामान्य नाही,
मी एक स्त्री आहे,
मी खरचं ग्रेट स्त्री आहे।।
घरामधे पाहुण्यांची ये-जा असते सतत,
आप्तेष्ट मित्रांचे स्वागत करते हसतं!
दमत नाहीस का ग कधी? मैत्रीणी विचारतात
सुन आमची कर्तृत्ववान, सासुबाई सांगतात,
खळखळून हसत मी प्रशस्ती स्विकारते,
कामाच्या वाटणीचे कौशल्य माझ्या मनातचं ठेवते.
कारण मी सामान्य नाही,
मी एक स्त्री आहे,
मी खरचं ग्रेट स्त्री आहे।।
मैत्रीणीच्या मदतीला मी कायम तयार असते,
त्यांच्या सुखदुखाःत मी भागीदार होते,
अडीअडचणींना त्यांना, प्रेमाने समजावते,
पिकनिक,पार्टी,गप्पांचा फड सहज जमवते,
नवरा म्हणतो, धमाल आहेस तु!
मी म्हणते, खरच कमाल आहे मी!
कारण मी सामान्य नाही,
मी एक स्त्री आहे,
मी खरचं ग्रेट स्त्री आहे।।
आँफीसमध्ये मिटींग्स महत्वाची डीस्कशन्स,
प्रोजेक्ट ची प्रेझेंटेशनस् स्टाफ चे ओरीएंटेशन,
कुठल्याही कामामधे, लागते माझी गरज,
आवडते मलाही जेव्हा लागतो बुद्धीचा कस,
एखादा प्राॅबल्म मी चुटकी सरशी सोडवता,
बाॅस म्हणतो महान आहेस!!
आत्मविश्वासाचं हासुन, मी मनोमन सुखावते,
स्वकष्टार्जित शिक्षणाला मनापासून दुवा देते.
कारण मी सामान्य नाही,
मी एक स्त्री आहे,
मी खरचं ग्रेट स्त्री आहे।।
कधीकधी येतात मात्र ढग निराशेचे,
काहीतरी बिनसते, निर्णय होतात चुकीचे,
दमून भागून एकटीच, मी दोन अश्रू ढाळते,
तरी स्वतःच्या कर्तृत्वावर शंका घेणं टाळते,
उद्या सगळं नीट होईल, मी स्वतःलाच आश्वासते,
नव्या उमेदीने मी कामाला लागते
कारण मी सामान्य नाही,
मी एक स्त्री आहे,
मी खरचं ग्रेट स्त्री आहे।।
🎧 कविता ऐकण्यासाठी इथे क्लिक करा:
स्त्री
✍ कवयित्री: स्वाती नामजोशी
🎙 कवितेचा आवाज: प्रगती जकाते