२०२५ च्या मध्यापर्यंत सोन्याचा दर प्रति औंस $३,०००(छायाचित्र - Her zindagi )

नवी दिल्ली ,२४ फेब्रुवारी २०२५

भारतामध्ये सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने सोने आणि चांदीच्या खरेदीत वाढ झाली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमती सातत्याने वाढत असल्यामुळे ग्राहकांवर त्याचा परिणाम होत आहे.

२४ फेब्रुवारी २०२५ रोजी, २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ₹८,०५५ तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ₹८,७८७ इतकी नोंदवली गेली.

२०२५ मध्ये सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होणार?

मेटल्स फोकस’ च्या अहवालानुसार, २०२५ च्या मध्यापर्यंत सोन्याचा दर प्रति औंस $३,०००

पर्यंत जाऊ शकतो. यामागील महत्त्वाची कारणे पुढीलप्रमाणे आहेत:

  • केंद्रीय बँकांकडून वाढती सोने खरेदी
  • अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीचे संकेत
  • जागतिक आर्थिक आणि राजकीय अस्थिरतेमुळे सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याची मागणी वाढ

सोन्याच्या किमती घसरणार?

भारत सरकारच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार, २०२५ मध्ये सोन्याच्या किमती घसरण्याची शक्यता आहे. तर चांदीच्या किमती वाढू शकतात. या अहवालानुसार, २०२५ मध्ये कमोडिटीच्या किमती ५.१% आणि २०२६ मध्ये १.७% कमी होण्याची शक्यता आहे.

ग्राहक आणि गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे काय?

Mumbai: Jewellers thrilled as citizens rush to buy gold
सोनेखरेदी (छायाचित्र -मिड डे)

सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे विशेषतः लग्नसराईच्या हंगामात ग्राहकांच्या खरेदीवर परिणाम होत आहे. त्यामुळे, गुंतवणूकदार आणि ग्राहकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
तज्ज्ञांच्या मते, जर सोन्याच्या किमती काही काळासाठी कमी झाल्या, तर तो खरेदीसाठी चांगला वेळ ठरू शकतो, कारण दीर्घकालीन पाहता, किंमती पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

मात्र, कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी सध्याच्या बाजार स्थितीचे सखोल विश्लेषण करून आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच निर्णय घेणे योग्य ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *