धोनीने कर्णधारपदाची धुरा सोडली! 'थाला'ने स्पष्ट केले की रुतुराज गायकवाडच चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करण्यासाठी योग्य पर्याय का आहे." 🏏💛 (छायाचित्र: Cricket.com)

चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) नवीन कर्णधारपदी रुतुराज गायकवाडची निवड करण्यात आली असून, हा निर्णय एका रात्रीत झालेला नाही. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने स्वतः या मोठ्या निर्णयामागील कारण स्पष्ट केले आहे.

धोनीने सांगितले – रुतुराजच योग्य पर्याय का?

CSK ने IPL 2025 च्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर धोनीने गायकवाडच्या कर्णधारपदाबद्दल स्पष्टीकरण दिले.

Ms dhoniआपण कायम पुढचा विचार केला पाहिजे. सातत्याने चांगली कामगिरी करणारेच निरंतर टिकतात.

असे धोनीने स्पष्ट केले.

त्याने पुढे सांगितले की, कर्णधार म्हणूनकर्णधार म्हणून ओपनर किंवा मुख्य फलंदाज महत्त्वाचा असतो. वेगवान गोलंदाजांना दुखापतीचा धोका अधिक असतो. रुतुराज गेल्या काही वर्षांपासून संघात सातत्याने खेळतो आहे. त्याचा स्वभाव शांत आहे आणि तो मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगसोबत उत्तम समन्वय ठेवतो. त्यामुळे तो सर्वोत्तम पर्याय आहे.

कर्णधारपद नसले तरी धोनीचा प्रभाव कायम!

गायकवाड संघाचा कर्णधार असला तरी धोनीचा अनुभव संघासाठी अमूल्य ठरत आहे. IPL 2025 च्या पहिल्या सामन्यात त्याने अवघ्या 0.12 सेकंदांत सूर्यकुमार यादवला स्टंपिंग करून सर्वांना चकित केले. वय 43 असले तरी त्याच्या विकेटकीपिंगच्या चपळतेत कोणतीही घट झालेली नाही. त्यामुळे धोनी कर्णधार नसला तरी CSK वर धोनीची छाप कायम राहणार!

CSK चाहत्यांसाठी हा एक वेगळा अनुभव असणार आहे . गायकवाडच्या नेतृत्वाखाली संघ कशी कामगिरी करतो, हे पाहणे रंजक ठरेल! 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *