भीमा कोरेगाव: सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे रक्तदान शिबिर.

पुणे, २ जानेवारी २०२५:

भीमा कोरेगाव हे संघर्ष आणि प्रतिकाराचे प्रतीक मानले जाते. दरवर्षी लाखो लोक येथे अभिवादन करण्यासाठी येतात. यंदा केवळ अभिवादन न ठेवता, सम्यक विद्यार्थी आंदोलनाने सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिर आणि सभासद नोंदणीचे आयोजन केले. या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला आणि त्यातून १३८ बाटल्या रक्त जमा झाले.

या उपक्रमाबद्दल बोलताना आयोजक रोहित डोळस म्हणाले,

फक्त इतिहास सांगून उपयोग नाही, आपल्या कृतीतून समाजासाठी काहीतरी देणेही तितकंच महत्त्वाचं आहे. हा उपक्रम त्याच दिशेने एक छोटं, पण महत्त्वाचं पाऊल आहे.

सभासद नोंदणीत नागरिकांना माहितीपत्रकांद्वारे सम्यकचे कार्य सांगण्यात आले. सम्यक विद्यार्थीच्या अध्यक्षांच्या म्हणण्यानुसार, “विद्यार्थ्यांचे हक्क आणि सामाजिक समता यासाठी आम्ही लढत आहोत आणि यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने आपली भूमिका बजावावी, अशी आमची इच्छा आहे.” या मोहिमेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एकत्र येण्याचे आणि समाजपरिवर्तनासाठी योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले. हा उपक्रम केवळ रक्तदानापुरता मर्यादित न ठेवता, सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करण्यासाठी घेण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून सामाजिक परिवर्तनाची नवी उमेद दिसून आली आणि यापुढेही असे उपक्रम सातत्याने राबवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *