( तुकाराम महाराजांच्या शब्दांतून वाहणारी माणुसकी, तसेच कोणत्याही भेदभावाच्या पलीकडची विचारधारा…”पुण्यात सुरू असलेल्या तुकाराम बीज सप्ताहाच्या निमित्ताने, ओम तांबे यांच्या स्वलिखित अभंगातून भक्तिरसाची अनुभूती! त्यांचा आवाज आणि या अभंगाचे शब्द ऐकल्यावर मन भरून येईल. )
तुका म्हणे मजं
हाती घेऊनं लेखणी,
लिही कविता देखणी,
मनी वसे संतवाणी ,
तुका म्हणे मजं ||१||
येरं येरं नामू माझ्या,
घेरं कवटाळूनं,
दुःख माझे विसराया,
देसी मिठी एकं ||२||
माझी आई जनाबाई,
पाठी सदा उभी राही,
राहे माझं चित्त ठाई,
तुका म्हणे मजं ||३||
चोखामेळा हा महारं,
मग सावळा कुंभारं,
माझ्या जीवाला त्यो तारं,
तुका म्हणे मजं ||४||
शिकावया माणूसकी,
मोडूनिया भेदभावं,
त्यागीयेलं घरदारं,
तुका म्हणे मजं ||५||
गेला बुद्ध तो शोधाया,
माझा कोरीला विठ्ठलं,
मनी सुख जे भेटलं,
तुका म्हणे मजं ||६||
मुक्ताई माझी झाली,
धाकली बहीणं,
सारी सारे तमोगुणं,
तुका म्हणे मजं ||७||
लोकयासी सुधाराया ज्ञानु,
घालवीलं हे जीवनं,
एकादसं मोठा सणं,
तुका म्हणे मजं ||८||
🎧 कविता ऐकण्यासाठी इथे क्लिक करा: तुका म्हणे मजं…
✍ कवी: ओम तांबे
🎙 कवितेचा आवाज: ओम तांबे
या अभंगाची झलक पाहण्यासाठी क्लिक करा! 📖✨ | @wartahar.in“
ओम तांबे खूप सुंदर…❣️🫂🔥