छायाचित्र : आदिती बगली (Pinterest) नजर खिळून राहते मुक्त आकाशामध्ये,
मग पिंजऱ्याच्या चौकटीचे भान होते.
आक्रोश माझा बाहेर पडण्यासाठी,
हल्ली लोकांसाठी गाणे होऊन जाते.
किती रोखून ठेवाल मला,
या बंधनात जगणे मला मान्य नाही.
समजत नाही भावना तुम्हाला,
याचा अर्थ असा नाही की,
“माझे काही म्हणणे नाही.”
पण भरारीशी माझा एक करार पक्का आहे,
पिंजऱ्यात अडकण्यास,आता माझा साफ नकार आहे.
फसतात प्रयत्न, पण सांगा आस्मानाला,
“माझी पुन्हा एक खेप बाकी आहे.”
पंखांना जाणीव झाली आहे क्षमतेची,
स्वातंत्र्याची या डोळ्यात आस आहे.
आता फक्त ,
स्वप्नांच्या आकाशातली एक झेप बाकी आहे…
🎧 कविता ऐकण्यासाठी इथे क्लिक करा:
👉 एक झेप बाकी आहे…
✍ कवयित्री: प्रगती जकाते
🎙 कवितेचा आवाज: प्रगती जकाते