आयुष्याचा प्रवास पाहताना नजरा सैरावैरा धावतात…
काहीतरी राहून गेलं अस सतत सांगतात……
मनात एक वेगळीच उणीव भासते…
पुन्हा भूतकाळात जाऊन जगावे असे वाटते….
काही राहिलेली स्वप्ने आता पुर्ण करावीशी वाटतात…
आठवणींचे अश्रू तर आजही डोळ्यांत दाटतात….
पुसून डोळे आता मन स्वप्नासाठी झटत….
मुक्त होऊन बंधणातून आयुष्य स्वतःसाठी जगायला शिकत….